नागपूर हादरलं! नागपुरात दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची अत्याचारानंतर केली हत्या |
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिची निर्घृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी मौदा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. धीरज सुरेश शेंडे असे आरोपीचे नाव आहे.
सदर प्रकरणातील अल्पवयीन विद्यार्थिनी ही १५ वर्षांची आहे. ती शिकवणी वर्ग झाल्यानंतर घरी परत जात असताना आरोपी धीरज शेंडे याने तिला बळजबरीने त्याच्या मोटरसायकलवर बसवले. त्यानंतर आरोपीने तिला कुही शिवारातील साळवा जंगलात नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिची निर्घृण हत्या केली.
दरम्यान ही घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. त्यानंतर मौदा पोलिसांनी तपास सुरू केला असता यामध्ये मौदा येथील भामेवाडा येथील धीरज सुरेश शेंडे नामक आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीने दिलेली माहिती आणि प्राथमिक तपासात ही घटना प्रेम प्रकरणातुन घडली असल्याचा स्पष्ट झाले आहे. त्या आधारे पोलिस तपास करत आहेत.
आरोपी धीरज सोबत मुलीची ओळख ही इन्स्टाग्रामवर झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. मात्र ती मुलगी दुसऱ्या मुलाच्या संपर्कात असल्याची माहिती समजल्याने संतापलेल्या आरोपीने तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली असल्याचे आता उघड झाले आहे. सावळा जंगलात अल्पवयीन मुलीचा रक्ताच्या थारोळ्यातला मृतदेह आढळून आल्यानंतर मौदा पोलिसांनी तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.