Highlights:
- कल्पतरू विद्यामंदिर 10वीचा निकाल 100 टक्के
- 9 वर्षापासून पासून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम
- शंभर टक्के निकाल देणारी सिंदेवाही तालुक्यातील ही पहिली शाळा
- ज्वलंत कारमेंगे कल्पतरू विद्यामंदिर शाळेतून अव्वल
सिंदेवाही - इयत्ता दहावी परिक्षेचा ( SSC 2022 ) निकाल नुकताच घोषीत करण्यात आला. त्यात सिंदेवाहीतील कल्पतरू विद्यामंदिर येथील इयत्ता दहावीचा निकाल १०० % लागलेला आहे. मागील नऊ वर्षापासून शंभर टक्के निकाल देणारी सिंदेवाही तालुक्यातील ही पहिली शाळा आहे. यावर्षी ९०% च्या वर ९ विद्यार्थी आणि ८०% च्या वर गुण प्राप्त करणारे १४ विदयार्थी आहेत. यात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शाळेतून प्रथम आलेला कल्पतरू विद्यामंदिर चा ज्वलंत कारमेंगे विदयार्थ्याने ९४. ४० टक्के गुण प्राप्त करीत अव्वल स्थान पटकाविले आहे.
#सिंदेवाही: कल्पतरू विद्यामंदिर 10वीचा निकाल 100 टक्के; 9 वर्षापासून पासून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम | Be Media
— Batmi Express ( Exam Helper ) (@batmi_express) June 23, 2022
Read News Blog: https://t.co/ndUZForDSC
Follow us Latest News:@batmi_express #BatmiExpress #chandrapur#sscresult2022 #education #news
कल्पतरू विदयामंदीर शाळेचा निकाल दरवर्षी शंभर टक्के लागत असून दहावीच्या निकालात ( SSC 2022 ) विदयार्थ्यांनी उत्कृष्ठ कामगिरी बजावित यश संपादन केले आहे. त्यात ज्वलंत कारमेंगे ९४. ४०% , मानसी लोखंडे ९४.२०% , शिवम सहारकर ९४. २०% , उर्वशी धानोरे ९३ .२०% , स्वयं जांभुळे ९२.६०% , परी सदन ९२% , सम्यक मेश्राम ९१. ४०% , प्रतीक रामटेके ९१. २०% , अनुश्री घोडमारे ९१. २०% गुण प्राप्त करीत गुणवंत झाले आहेत. सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे कल्पतरूचे संस्थापक धनंजय बन्सोड आणि सर्व शिक्षकवृंद यांनी कौतुक केले.