भामरागड : पोलिस खबरी असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी काल रात्री भामरागड तालुक्यातील मलमपोडूर येथील एका इसमाची हत्या केली. लकीकुमार ओक्सा (३८) असे मृत इसमाचे नाव असून तो बिनागुंडा येथील मूळ रहिवासी होता. लकीकुमार ओक्सा हा मलमपोडूर येथे तेंदूपत्ता फळीवर मुंशी म्हणून काम पाहत होता. काल रात्री १० वाजता सशस्त्र नक्षलवादी मलमपोडूर येथे गेले. त्यांनी लकीकुमारला झोपेतून उठवून गावाबाहेर नेले आणि नंतर तीक्ष्ण शस्त्राने त्याची हत्या केली.
आज सकाळी गावाबाहेर त्याचा मृतदेह आढळूनअसून नक्षल्यांची पत्रके मात्र आढळून न आल्यामुळे सदर हत्या नक्षल्यांनीच केलिका नाही याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
जून २३, २०२२
0
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.