पालघर : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीचे पडसाद (Maharashtra Political Crisis) पालघरमध्ये (Palghar) ही उमटू लागले असून आज सकाळी १०:३० वाजता एकनाथ शिंदे यांचा निषेध (Protest Against Eknath Shinde) करण्यासाठी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांनी (Shivsainiks) पालघर येथील हुतात्मा स्तंभाजवळ (Hutatma Memorial) उपस्थित राहण्याचे आवाहन पालघर जिल्हा शिवसेनेने शिवसैनिकांना सामाजिक प्रसार माध्यमावर केले असून शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांचा पालघर जिल्ह्यावर (Palghar District) वरदहस्त आहे. त्यांनी स्वपक्षातच उभारलेल्या बंडाचे पाऊल त्यांना मानणाऱ्या वर्गास रुचलेले नाही. जिल्ह्यातील नेते उघडपणे बोलण्यास कचरत आहेत. मात्र सर्वसामान्य शिवसैनिक शिंदे बाबत भयंकर संतापलेला आहे. शिंदे यांच्या समर्थनार्थ बोईसर येथे लावण्यात आलेल्या फलकावर शिवसैनिकांनी गद्दार लिहून त्यांच्या फोटोस काळे फासले आहे. त्याचबरोबरीने जिल्ह्यातील काही भागात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ फलक झळकले आहेत.
पुन्हा या संकटानिमित्ताने ही ताकद आपल्याला दाखवायची आहे. तेव्हा आज सर्व शहर प्रमुख, उपतालुका प्रमुख, आजी -माजी सर्व जबाबदार पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी, अल्पसंख्याक विभाग, उत्तर भारत्तीय विभाग व सर्व शिवसेना संलग्न संघटनांच्या पदाधिकारी यांनी शिवसैनिकांच्या माध्यमातून भगवा ध्वज खांद्यावर घेऊन निषेध नोंदवण्यासाठी मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन शिवसेना पालघर जिल्ह्याच्या वतीने सामाजिक प्रसारमाध्यमांवर शिवसैनिकांना करण्यात आले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.