महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येईल. राज्य मंडळाचे सचिव माणिक बांगर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी बारावीची परीक्षा न होता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे यंदाच्या परीक्षेबाबतही साशंकता होती. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य मंडळाने यंदा मार्च-एप्रिलमध्ये बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली. राज्यातील १४ लाख ८५ हजार १९१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परीक्षेनंतर निकाल कधी जाहीर होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते.
महाराष्ट्र बारावीचा निकाल 2022 कसा तपासायचा:
- बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि होमपेजवरील इयत्ता 12वीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा रोल नंबर आणि/किंवा नोंदणी क्रमांक टाका.
- तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
- भविष्यातील वापरासाठी निकाल पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.
विद्यार्थी बारावीचा निकाल खालील संकेतस्थळावर पाहू शकतात: कुठे पाहाल निकाल?
विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयातर्फे १७ जूनला गुणपत्रिका दिल्या जातील. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या पुरवणी आणि श्रेणीसुधार परीक्षेचे अर्ज १० जूनपासून भरून घेतले जाणार असल्याचेही प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.