जून १७, २०२२
0
गडचिरोली : गडचिरोली पासून अवघ्या ४ किमी अंतरावरील गुरवळा रोडवर विहिरगाव फाट्यानजीक अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकी स्वार ठार झाल्याची घटना आज घडली.दुचाकी स्वार हा गडचिरोली वरून परत आपल्या गावी जात असताना ही घटना झाली, चार चाकी अज्ञात वाहनाने धडक दिली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला ,मृत पावलेल्या इसमाचे नाव राजू कवडू बोदलकर( वय ५०) रा.( राखी )गुरवळा , तर जखमी इसमाचे नाव भीमराव नगराळे रा, (राखी) गुरवळा त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले .
पोलीस घटनास्थळावर पोहचून घटनेचा पंचनामा करून मृत झालेल्याचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात गडचिरोली येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे .झालेल्या घटनेने मृतकाच्या घरी शोक पसरला आहे .अज्ञात वाहना विरोधात गडचिरोली पोलीस स्टेशन ला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे .
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.