कोरची : स्थानिक श्रीराम विद्यालय कोरची शाळेचा एसएससी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. परीक्षेत एकूण 71 विद्यार्थी बसले होते. पैकी 71 ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात प्राविण्य प्राप्त 18 विद्यार्थी असून प्रथम श्रेणीत 47 विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत 06 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दिव्या किरण अग्रवाल हिला 500 पैकी 426-85.20 टक्के, ऐश्यवर्या छत्रपाल अंबादे हिला 500 पैकी 424-84.80 टक्के तर झासीका तिलक मांडवे हिस 500 पैकी 421-84.20 टक्के गुण प्राप्त केले आहे.
विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एन. गजभिये, पर्यवेक्षक एन के गोबाडे, अध्यापक एच. पी. भूसारी, डी. एम. नाकतोडे, एम. पी. बाविस्कर व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देवून अभिनंदन केले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.