विभागनिहाय निकालामध्ये पुणे: 96.96%, नागपूर: 97%, औरंगाबाद: 96.33%, मुंबई: 96.94%, कोल्हापूर: 98.50%, अमरावती: 96.81 %,नाशिक: 95.90%,लातूर: 97.27% , कोकण: 99.27%, असा निकाल लागला आहे. तर 95.90 टक्क्यांसह नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Maharashtra SSC Result 2022: गेल्या कित्येक दिवसांपासुन विद्यार्थी आणि पालक 10वीच्या निकालाची आतुरतेने वाट बघत होते. आज अखेर दहावीचा निकाल लागणार आहे. त्याअगोदर 10वीचा विभागनिहाय निकाल लागला आहे. या परिक्षेत कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. कोकण विभागाचा निकाल ९९.२७ टक्के लागला आहे.
तर विभागनिहाय निकालामध्ये पुणे: 96.96%, नागपूर: 97%, औरंगाबाद: 96.33%, मुंबई: 96.94%, कोल्हापूर: 98.50%, अमरावती: 96.81 %,नाशिक: 95.90%,लातूर: 97.27% , कोकण: 99.27%, असा निकाल लागला आहे. तर 95.90 टक्क्यांसह नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
विद्यार्थ्यांची आकडेवारी:
- एकूण परीक्षेला बसले विद्यार्थी : 15,68,977
- एकूण उत्तीर्ण विद्यार्थी: 15,21,003
- निकालाची टक्केवारी : 96.94 टक्के
विभागानुसार लागलेले निकाल टक्केवारी...
- पुणे: 96.96%
- नागपूर: 97%
- औरंगाबाद: 96.33%
- मुंबई: 96.94%
- कोल्हापूर: 98.50%
- अमरावती: 96.81 %
- नाशिक: 95.90%
- लातूर: 97.27%
- कोकण: 99.27%
या निकालामध्ये देखील मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.96 टक्के तर मुलांचा निकाल 96.06 टक्के लागला.
निकालाची ठळक वैशिष्ट्ये:
या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,८४,७९० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,६८,९७७ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १५,२१,००३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.९४ आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ५४,१५९ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५२.३५१ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी ४१,३९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ७९.०६ आहे.
सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्याथ्र्यांचा कोकण विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी ९९. २७ अशी सर्वाधिक असून सर्वात कमी उत्तीर्णतिची टक्केवारी नाशिक विभागाची ९५.९० अशी आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.९६ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.०६ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा १.९० ने जास्त आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ८,१६९ दिव्यांग विद्याथ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८,०२९ दिव्यांग विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी ७,५७९ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.४० आहे. एकूण २४ विषयांचा निकाल १००% टक्के लागला आहे.
राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्याथ्यांपैकी ६,५०,७७९ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत ५,७०,०२७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत २.५८,०२७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ४२.१७० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यातील २२,९२१ माध्यमिक शाळांतून १६,३८,९६४ विद्याथ्र्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १२,२९० शाळांचा निकाल १००% लागला आहे.
यंदा राज्यात ९ विभागीय मंडळांमार्फत १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा झाली. १६,३९,१७२ विद्यार्थी या परीक्षेसाठी राज्यभरातून बसले होते. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील, निकालाची प्रत (प्रिंट) देखील घेता येईल.
SSC Result 2022 Live - 10वीचा निकाल तपासण्यासाठी खालील वेबसाइट:
SSC Result 2022 Live - महाराष्ट्र बोर्डाचा एसएससी निकाल कसा तपासणार?
- mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- महाराष्ट्र एसएससी निकाल 2022 या लिंकवर क्लिक करा
- तुमचा रोल नंबर आणि इतर तपशील प्रविष्ट करा
- तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल ( SSC Result 2022 ) तपासा.
- महाराष्ट्र ( SSC Result 2022 ) बोर्डाचा निकाल 2022 स्क्रीनवर प्रदर्शित होईल
- भविष्यातील वापरासाठी परिणाम पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.
SSC Result 2022 - एवढ्या विद्यार्थ्यांनी दाखले केला होता अर्ज:
या वर्षीची महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांची मार्च आणि एप्रिल महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला 16,38,964 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यापैकी 8,89,505 मुले तर 7,49,458 मुलींनी दहावीची परीक्षा दिली होती.
लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आजच्या निकालामुळे संपणार:
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आजच्या निकालामुळे आता संपणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) आज 17 जूनला रोजी दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल (SSC Result 2022 ) ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांचे निकाल अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि mahahsscboard.in वर प्रसिद्ध केला जाणार आहे. या परिस्थितीत या वर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या एसएससी परीक्षेत (SSC Exam Resut 2022) बसलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेशपत्र घेऊन तयार राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. निकाल जाहीर होताच, रोल नंबर, आईचे नाव आणि जन्मतारीख यांच्या मदतीने निकाल (Maharashtra SSC Result 2022) या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट व्यतिरिक्त, तुम्ही प्रथम बातमी एक्सप्रेस च्या एक्साम हेल्पर वर निकाल पाहू शकणार आहात. महाराष्ट्र बोर्डाच्या एसएससी निकालाच्या लाइव्ह अपडेटसाठी बातमी एक्सप्रेस पोर्टलच्या संपर्कात रहा.