'
30 seconds remaining
Skip Ad >

भंडारा: दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू तर गंभीर जखमी, दोन वर्षांपासून रस्त्याचे काम रखडल्याने पाच जणांचा गेला जीव, नागरिकांचा रास्ता रोकोचा इशारा - Batmi Express

0
Bhandara Accident,Bhandara Batmya,Bhandara,Bhandara Live,Bhandara News,Bhandara Marathi News,Maharashtra,

सालई खुर्द : मोहाडी तालुक्यातील तुमसर-रामटेक  रस्त्यावरील सालई खुर्द जवळील कैलास बघत यांच्या घरासमोर दुचाकीवरून प्रवास करताना दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर, दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार, ४ मे २०२२ रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. अपघाताची नोंद आंधळगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

प्रज्वल जालंधर  गायकवाड (२५) रा. नयाकुंड ता. पारशिवणी, असे मृतकाचे नाव आहे. तर, अरविंद अमरदीप गजभिये (२६), श्रावण पुरूषोत्तम गजभिये (१५) दोघेही (रा. नयाकुंड ता. पारशिवणी जि. नागपूर) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हे तिघेही मित्र असून, ते मोटरसायकलने उसर्राहुन नरखडला (पारशिवणी) जात होते. सालई – उसर्रा रत्यावरील कैलास भगत यांच्या घराजवळ  पोहचतात मोटारसायकलवरील ताबा सुटला व ती स्लीप झाल्याने तिघेही खाली कोसळले. यात प्रज्वलच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सालई खुर्द ते उसर्रा येथील जवळपास १ कि.मी. सिमेंट रस्त्याचे काम दोन – तीन वर्षांपासून रखडल्यामुळे दर दिवसाला एक अपघात घडत आहे. रखडलेल्या रस्ता व पुलासाठी अनेक आंदोलने झाली, मात्र अजूनही रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. या रस्त्यावर ३६५ दिवसात २०० च्यावर अपघात झाले असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. मृतक हे उसर्रा येथील राहुल बोरकर यांच्या लग्नसमारंभ आटोपून नयाकुंड (पारशिवणी) आपल्या गावी परत जात असतांना हा अपघात झाला आहे. या रत्यावरील हा पाचवा अपघात असून यात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

दीड वर्षापासून अर्धवट असलेल्या रस्त्याचे बांधकाम त्वरित करण्यात यावे, रस्ता अपूर्णावस्थेत असल्यामुळे अपघातात वाढ झाली आहे. त्यामुळे काल एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाला, रखडलेल्या रस्त्याच्या धुळीमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. या आधी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा यांना निवेदन देण्यात आले होते. जर आठ दिवसात रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही तर, परिसरातील नागरिकांच्या वतीने रास्ता रोखो आंदोलन करण्याचा ईशारा सामाजिक कार्यकर्ता किशोर भैरम यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×