'
30 seconds remaining
Skip Ad >

नागपूर पॅटर्नचा वापर करून गोंदिया शहरात ऑनलाईन देहविक्रीचा धंदा, सोशल मीडियावरून फोटो दाखवून होतोय डिलिंग - Batmi Express

0

Gondia,Gondia Crime,Gondia Live News,Gondia Marathi News,gondia news,Maharashtra,Online prostitution in the Gondia city using Nagpur pattern

गोंदिया
: शहरातील अनेक प्रतिष्ठित वस्त्यांमध्ये देहविक्रीचे अड्डे तयार झाले आहेत. यंत्रणेतील काही अधिकारी, कर्मचारीसुद्धा येथे रसपान करत असल्याने थेट कारवाई होताना दिसत नाही. परिसरातून एखादी तक्रार आल्यानंतरही त्याचा वेगळ्याच पद्धतीने फायदा घेतला जातो. अगदी दहा किलोमीटर परिघात वसलेल्या शहरातही आता महानगराचे पॅटर्न अवैध व्यवसायासाठी वापरले जात आहे.

शहरातील, ग्रामीण भागातील मुलींना नादी लावण्याचे प्रकार जोरात सुरू आहे. पूर्वी दिवसाच काही लॉजमध्ये हा व्यवसाय चालत होता. शहरातील काही भागांत दिवसरात्र घरांमध्ये देखील हा धंदा सुरू होता. नागरिकांनी या विरोधात एल्गार पुकारल्यानंतर पोलिसांनी छापामार कारवाई करून ते अड्डे बंद पाडले होते. मात्र पुन्हा हा व्यवसाय डोके वर काढून तांदूळ नगरीत आपले पाय पसरत आहे. आता याच्या कक्षा विस्तारल्या असून ठराविक असा कोणता एरिया राहिलेला नाही. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा राजरोसपणे वापर केला जात आहे. त्याचे तसे ग्रूप तयार झाले आहेत.

अल्पवयीन मुलेही याचा बळी पडत आहेत. शहरातील काही ठराविक भागांमध्ये फ्लॅट भाड्याने घेवून त्या ठिकाणी हा व्यवसाय सुरू आहे. अनेकांनी तर त्याच दृष्टीकोनातून शहराच्या बाहेरील भागात घर बांधले आहे. त्या ठिकाणी थांबण्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे. तासभराचे पाचशे रुपये याप्रमाणे खोली भाड्याने दिली जाते. काही हॉटेलमध्ये देखील हा व्यवसाय सुरू आहे. पोलीस प्रशासनातील काहींना हा प्रकार माहीत आहे. मात्र, कारवाई न करता त्या व्यवसायाला चालना देण्याचे काम खुद्द पोलिस विभागातीलच काही कर्मचारी करत आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

 फोटो दाखवून होतंय डीलिंग

सोशल मिडीयावर हा व्यवसाय तेजीत सुरू आहे. ग्राहकांना संबंधितांचे छायाचित्र दाखवून त्यावरून किंमत ठरविली जाते. जागा हवी असल्यास त्याचा दर अधिक वाढतो. शहरातील अल्पवयीन मुलांसह तरूण आणि वयस्क आंबट शौकीन देखील यात गुंतले आहेत.

वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज

शहराच्या वैभवाला गालबोट लावणाऱ्या या व्यवसायाकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. प्रतिष्ठीतांना वस्त्यामध्ये असे प्रकार होतात. विशेष करून अर्पाटमेंट अथवा एका कडेला असलेल्या घराचा आसरा घेतला जातो. प्रतिष्ठीतांसाठी तर खास व्यवस्था करणारे सुद्धा सक्रीय झाले आहे. थेट नागपूरवरून आयात केली जाते. त्यामुळे शहराचे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे.

पॉश वस्त्यांचा आडोसा

बसल्या जागी पैसा कमावण्याचा मार्ग म्हणून अनेक जण ऑनलाईन देहविक्री व्यवसायात उतरले आहे. कुणाला संशय येऊ नये, यासाठी या व्यवसायाचे अड्डे पॉश वस्त्यांमध्येच सुरू करण्यात आले आहे. या व्यवसायाची प्रशासनाला माहिती असली तरी प्रशासनातीलच अनेक प्रतिष्ठीत या धंद्यातील सेवेचे नियमित लाभार्थी असल्याने कारवाई होण्याचा प्रश्नच नाही. वाढत्या देहविक्रीच्या रॅकेटमुळे शहराच्या सामाजिक स्वास्थ्याला धोका निर्माण झाला आहे. तर यंत्रणेतील काही घटक याला स्वार्थासाठी अप्रत्यक्षरित्या अभय देत असल्याचे सांगण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×