पोंभूर्णा:- पोंभूर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या चिंतलधाबा बिटातील बेर्डी जंगल तलावानजीक एका वृद्ध इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलिसाची टिम घटनास्थळी दाखल झाली. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसाकडून तपास सुरू केला आहे.
पोंभूर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या चिंतलधाबा बिटातील कक्ष क्रमांक ११९ मधील बेर्डी जंगल तलावानजीक बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या शेरक्यांना एका व्यक्तीचा मृतदेह पडून असल्याचे निदर्शनास आले. याची माहिती बेर्डी येथील पोलिस पाटलाला मिळताच सदर घटनेची माहिती कोठारी पोलिसांना व पोंभूर्णा वनविभागाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलिसाची टिम घटनास्थळी दाखल झाली. सदर मृतदेह हा अनोळखी व्यक्तीचा असून पंचावन वर्षांच्या वरील वय असलेल्या वृद्धाचा असावा असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. घटनेचा पुढील तपास कोठारी पोलिस करीत आहेत.