'
30 seconds remaining
Skip Ad >

धक्कादायक! ७ वर्षांच्या चिमुरडीसह आईने केली रेल्वेखाली आत्महत्या | Batmi Express

0

नागपूर - मोबाइल का बघतेस यावरून मुलींसोबत वाद; आईची आत्महत्या,Nagpur Suicide,suicide,suicide news,Nagpur LIve,nagpur news,Nagpur,crime Nagpur

सफाळे : पश्चिम रेल्वेच्या सफाळे (Safale) व केळवेरोड (Kelwe Road) स्थानकादरम्यान मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ७ वर्षाच्या चिमुरडीसह आईने आत्महत्या (Woman Commits Suicide With Daughter) केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी (Railway Police) घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून दिले.

तृप्ती आरेकर (३० वर्षे) असे आईचे नाव असून जिगीशा आरेकर (७ वर्षे, मुलगी) अशी मृतांची नावे असून त्या पालघर तालुक्यातील पोफरण (अक्करपट्टी) येथील राहणाऱ्या होत्या. मंगळवारी रात्री मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सौराष्ट्र एक्स्प्रेस ट्रेनखाली त्यांनी आत्महत्या केली. याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी एका दुचाकीसह रुळामध्ये पडलेले आधार कार्ड व मोबाईल फोन आढळून आले. मात्र मोबाईलमधील सिम कार्ड आधीच काढून फेकून देण्यात आले होते. आधार कार्डवरील माहितीवरून त्यांची ओळख पटल्याने रात्री उशिराने सफाळे रेल्वे पोलीस ठाण्यात नातेवाईक पोहोचले.

दोघी मायलेकिंनी आत्महत्या का केली ? याचे कारण अद्याप अस्पष्ट असून सफाळे रेल्वे पोलीस त्याचा अधिक तपास करीत आहेत. तर या घटनेमुळे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या काही काळ रोखून ठेवण्यात आल्या होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×