मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Corona Update) पुन्हा वाढ होत असल्याचे चित्र आहे. बुधवारी राज्यात १८८ रुग्णांचे (Maharashtra Corona Update) निदान झाले आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील हजारापार गेली आहे. राज्यात सध्या १०४९ सक्रीय रुग्ण आहेत. तसेच गेल्या चोवीस तासात एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासात १६६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज एका कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर १.८७ टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत ७७,२९, ४६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत ८,०२,७०, ६९६ प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. राज्यात सध्या १०४९ सक्रीय रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत ६४२ सक्रीय रुग्ण आहे. त्या खालोखाल सक्रीय रुग्ण पुण्यात आहे. पुण्यात २२३, ठाण्यात १०० सक्रीय रुग्ण आहे.