गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी 1 मे 2019 मध्ये भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात 15 जवान आणि गाडीचा ड्रायव्हर शहीद झाले होते. पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाच्या दोन गाड्यांवर नक्षलवाद्यांनी लक्ष्य केलं. महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत होते. नक्षलवाद्यांनी 30 एप्रिल 2019 च्या रात्रीच रस्त्याचं काम सुरु असलेल्या ठिकाणी तब्बल 30 वाहने पेटवून दिली. त्यानंतर 1 मे 2019 ला पुन्हा नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून भीषण हल्ला केला.
पोलिसांच्या शीघ्र कृती दलावर नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला होता. या हल्ल्यात 15 जवान आणि गाडीचा ड्रायव्हर शहीद झाले होते. सी-60 तुकडीचे हे सर्व जवान होते. गस्तीवर जाणाऱ्या जवानांना लक्ष्य करुन नक्षल्यांनी हा हल्ला केला.
1 मे 2019 कुरखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. यात शहीद झालेल्या 15 जवान आणि गाडीचा ड्रायव्हरला भावपूर्ण श्रद्धांजली...
हल्ला नेमका कुठे झाला?
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा आणि लेंढारी गावादरम्यान ही घटना 1 मे 2019 ला महाराष्ट्र दिनी घडली. लेंढारी गावाजवळ वळण आहे. या ठिकाणी भूसुरुंग घडवला. हा जंगलाचा भाग आहे. 30 एप्रिल 2019 ला नक्षलवाद्यांनी ठेकेदारांची वाहने जाळली होती. ही घटना पाहण्यासाठी, त्याच्या तपासासाठी पोलिसांचं शीघ्र कृती दल जात होतं. त्यावेळी हा प्रकार घडला. नक्षवाद्यांना माहित होत गाड्या जाळल्यानंतर तपासासाठी पोलीस येणार. त्यामुळे त्यांनी एकप्रकारे सापळा लावला होता. असं म्हटलं जात होतं.
गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरूंग स्फोटात 15 जवान आणि गाडीचा ड्रायव्हर शहीद झाले होते. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ही घटना घडल्याने राज्यात एकीकडे शहीदांबद्दल हळहळ व्यक्त होतेय. तर दुसरीकडे नक्षलवाद्यांविरोधात नागरिकांमध्ये संतप्त भावना आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. विशेष म्हणजे ज्या कुरखेडा येथे नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोट घडवून हल्ला केला तेथील पाच जवान शहीद झालेत.
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची नावं पुढली प्रमाणे...
- साहुदास बाबूराव मडावी रा. चिखली ता. कुरखेडा, जि. गडचिरोली
- प्रमोद महादेवराव भोयर रा. देसाईगंज ता. देसाईगंज जि.गडचिरोली
- राजू नारायण गायकवाड रा. मेहकर जि. बुलडाणा
- किशोर यशवंत बोबाटे रा. चुरमुरा ता. आरमोरी जि. गडचिरोली
- संतोष देवीदास चव्हाण रा.ब्राह्मणवाडा ता. औंध जि. हिंगोली
- सर्जेराव एकनाथ खरडे रा.अलांद ता.देऊळगाव राजा जि. बुलढाणा
- दयानंद सहारे रा.दिघोरी मोठी ता लाखांदूर जि. भंडारा
- भूपेश पांडुरंग वालोदे रा.लाखनी जि. भंडारा
- आरीफ तौशीब शेख रा.पाटोदा जि. बीड
- योगाजी सिताराम हलामी रा. मोहगाव ता. कुरखेडा, गडचिरोली
- पुरणशहा प्रतापशहा दुगा रा.भाकरोंडी ता. आरमोरी जि. गडचिरोली
- लक्ष्मण केशव कोडापे रा.येंगलखेडा ता. कुरखेडा. गडचिरोली
- अम्रुत प्रभूदास भदादे रा.चिंचघाट ता. कुही जि. नागपूर
- अग्रमान बक्षी रहाटे र. तरोडा ता. आर्णी जि. यवतमाळ
- नितीन तिलकचंद घोडमारे रा.कुंभाली ता. साकोली जि. भंडारा
या हल्ल्यात खासगी गाडीच्या चालकाचाही मृत्यू झाला. त्यालाही शहीदाचा दर्जा देण्यात आला आहे. तसंच त्याच्या कुटुंबीयांना तत्कालीन सरकारकडून मदतीही देण्यात आली.