ऑनलाइन परीक्षा न झाल्यास विद्यापीठात बेमुदत उपोषण, वैभव निखाडे यांचा कुलगुरू व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून मोठा इशारा - Batmi Express

Be
0

ऑनलाइन परीक्षा न झाल्यास विद्यापीठात बेमुदत उपोषण, वैभव निखाडे यांचा कुलगुरू व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून मोठा इशारा - Batmi Express

यवतमाळ
: कोरोनानंतर कॉलेज पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यामुळे आगामी उन्हाळी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याची घोषणा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने केली आहे. मात्र, अर्ध्यापेक्षा जास्त सत्रात ऑनलाइन पद्धतीने शिकविले गेल्यानंतर आता परीक्षा का ऑफलाइन घेण्यात येत आहेत, असा सवाल विद्यार्थी उपस्थित करीत आहे. विद्यापीठाने सदर निर्णय मागे घेऊन ऑनलाइन परीक्षा घ्यावा, अन्यथा विद्यापीठासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा वैभव निखाडे यांनी निवेदनातून दिला आहे.

कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असले तरी अन्य राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. कॉलेज सुरू झाले, परंतु अनेक वर्गांचा बहुतांश अभ्यासक्रम अद्यापही पूर्ण झालेला नाही. प्रात्यक्षिकांवर आधारित अभ्यासक्रम पूर्ण करायला विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय, ऑफलाइन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्राध्यापकांना पुरेसा अवधी मिळाला नसल्याने येणाऱ्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घेण्यात यावा, असाही आग्रह विद्यार्थी धरत आहे.

विदर्भात अनेक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण अद्याप सुरू झालेले नाही. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान बघता आगामी परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेतल्या जाव्यात, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मागणी मान्य न झाल्यास अमरावती विद्यापीठात विद्यार्थ्यांसह बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा वैभव निखाडे यांनी विद्यापीठाचे कुलगुरू तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.

ऑनलाईन शिकवले परीक्षा ऑफलाईन का ?

कोरोनानंतर कॉलेज पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यामुळे आगामी उन्हाळी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याची घोषणा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने केली आहे. मात्र, अर्ध्यापेक्षा जास्त सत्रात ऑनलाईन पद्धतीने शिकविले गेल्यानंतर आता परीक्षा का ऑफलाइन घेण्यात येत आहेत, असा सवाल विद्यार्थी उपस्थित करीत आहे. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात याव्या, या मागणीसाठी विद्यापीठाच्या परिसरात विद्यार्थी तसेच सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी तसेच सर्व पक्षाचे विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->