Coronavirus Live Maharashtra: राज्यात पुन्हा कोरोनाचा कहर सुरु; रुग्णात मोठी वाढ |
Coronavirus Live Maharashtra: राज्यात मागील काही महिन्यांपासून कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढण्यास सुरूवात झाली आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. राज्यात आज कोरोनाचे १६९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, यादरम्यान, एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यूही झाला आहे.
आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत १७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १ हजाराच्या खाली आली आहे. राज्यात आतापर्यंत ७७,२९,०६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के झाले आहे. सध्या राज्यात कोरोनाचे ९९५ सक्रिय रुग्ण आहेत.