चंद्रपूर: ताडोबा जंगलातील वाघांची शान म्हणजे “वाघडोह” हा वाघ म्हातारा व अशक्त आहे मात्र म्हाताऱ्या वयात सुद्धा शिकार करीत गुरख्याला ठार केले. शहराजवळील सिनाळा गावातील 65 वर्षीय दशरथ पेंदोर हा काल 20 मे ला गावालगत असलेल्या तलावाजवळ बकऱ्या चारण्यासाठी गेला होता, मात्र सायंकाळी गावात दशरथ परत न आल्याने नागरिकांनी शोधाशोध सुरू केली पण दशरथ चा शोध लागला नाही.
आज सकाळी नागरिकांनी पुन्हा शोध घेतला असता तलावजवळील काही अंतरावर दशरथ चा छिन्न विच्छिन्न अवस्थेत मृतदेह नागरिक व वन कर्मचाऱ्यांना आढळून आला. मागील काही दिवसांपासून सिनाळा परिसरात ताडोब्यातील सर्वात मोठा वाघ “वाघडोह” चा वावर आहे, अतिशय अशक्त व म्हातारा असल्याने वनविभागाने त्याच्यावर नजर ठेवली होती, मात्र वनविभागाची नजर चुकताच त्याने शिकार केली.सदर घटनेमुळे ग्रामस्थांचा वनविभागावर रोष व्याप्त झाला आहे.विशेष म्हणजे वाघडोह अजूनही गाव परिसरात फिरत आहे.