औरंगाबाद शहरात एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला आहे. हा गंभीर प्रकार देवगिरी महाविद्यालयाजवळ घडला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. सध्या आरोपी फरार असून त्याच्या मागावर पोलिसांची 3 पथके असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रंथी सुखप्रीत कौर प्रीतपाल सिंग असे मृत विद्यार्थींनीचे नाव आहे. ती विद्यार्थिनी बीबीएच्या प्रथम वर्गात शिकत होती.
माहितीनुसार, मृत विद्यार्थिनी आणि मारेकरी दोघेही उस्मानपुऱ्यातील आहेत. ते एकमेकांच्या ओळखीचेही होते. ते एका कॅफेत बसले होते तेथे त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे कॅफेचालकाने त्यांना बाहेर जाण्यास सांगितले, तेथून निघाल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला. यानंतर मारेकऱ्याने त्याच्याजवळील शस्त्र काढले तेव्हा जीवाच्या आकांताने तरुणी पळु लागली. ती ओरडत असल्याने लोकही मागे पळत सुटली होती. त्याने तिला गाठून तिच्या गळा शस्त्राने कापला यातच तिचा मृत्यू झाला.
खूनापूर्वी मारेकऱ्याने विद्यार्थिनीला 200 फूट ओढत नेले त्यानंतर तिचा गळा कापून खून केला. एकतर्फी प्रेमातून घडली घटना अशी माहिती मिळत आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.