मे २७, २०२२
0
थॉईसपासून सुमारे 25 किमी अंतरावर हा अपघात झालाय. लष्कराची बस 50-60 फूट खोलवर श्योक नदीत कोसळली. ज्यामध्ये लष्कराचे सर्व जवान जखमी झाले.
सर्व जवानांना परतापूर येथील 403 फील्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आणि लेहहून परतापूरला सर्जिकल टीम पाठवण्यात आली.
गंभीर जखमी जवानांच्या मदतीसाठी हवाई दलाशीही संपर्क साधण्यात आला आहे. त्यांना उपचारासाठी वेस्टर्न कमांडकडे पाठवले जाऊ शकते. लष्कराची बस कोणत्या कारणांमुळे रस्त्यावरून घसरली आणि नदीत पडली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेबाबत लष्कराकडून अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार, सैनिकांची बस शिबिरातून सब सेक्टर हनिफच्या पुढे जाण्याच्या दिशेने जात होती, त्याचवेळी हा अपघात झाला.
महाराष्ट्रातील दोन जवान शहीद:
कोल्हापूर जिल्ह्यातील एका जवानाचा समावेश असल्याची माहिती मिळतेय. प्रशांत जाधव असं शहीद जवानाचे नाव आहे. ते गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे गावचे रहिवासी होते. प्रशांत जावध यांचे पार्थिव उद्या बेळगावमध्ये आणलं जाणार असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
तर साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील विसापूरचे सुभेदार विजय सर्जेराव शिंदे हे देखील या अपघातात शहीद झाले आहेत.
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.