ब्रेकिंग गडचिरोली: भामरागड तालुक्यात पोलिस – नक्षल चकमक…1 जवान जखमी | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli live,Gadchiroli News,Gadchiroli Naxal

Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli live,Gadchiroli News,Gadchiroli Naxal,

गडचिरोली: जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेला भामरागड तालुक्यातील धोंडराज जवळील भटपार ते इरपणार परिसरात आज सकाळच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली असून या चकमकीत एक पोलीस जवान जखमी झाला असून अद्यापही चकमक सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सविस्तर वृत्त असे कि भामरागड तालुक्यातील धोंडराज जवळील भटपार ते इरपणार परिसरात गडचिरोली पोलीस दलाचे सी. ६० कमांडो नक्षल विरोधी अभियान राबवित असताना धबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने अंधाधून गोळीबार केले असून यात एक पोलीस जवान जखमी झाला आहे, जखमी पोलीस जवानाला नागपूर येथे रुग्णालयात हलविण्यात आले असून सदर जखमी जवानाची प्रकृती धोक्याबाहेर असून अद्यापही चकमक सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी बोलताना दिली..

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.