भंडारा : जादूटोण्याच्या संशयातूनच विधवा महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. नवेगावात कपडे धुवायला गेलेली 45 वर्षीय महिलेचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे.
मनात संशयाने घर केले की किती मोठा अनर्थ घड़तो याची प्रचिती भंडाऱ्यात आली असून जादूटोना करत आपल्या पत्नीला मारल्याचे कारण समोर करत एका आरोपीने मित्राच्या मदतीने 45 वर्षीय महिलेची डोक्यावर काठीने हल्ला करण्यात आला. त्यानंत गळा दाबून हत्या केल्याची घटना कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत नवेगांव येथे उघड झाली आहे.या हत्येप्रकरणी राजहंस कुंभरे, विनोद रामटेके (दोघे, रा. नवेगाव (कोका) यांना अटक करण्यात आली आहे. कोका वन्यजीव अभयारण्यालगत असलेल्या संरक्षित वनातील नवेगाव येथील कपडे धुवायला गेलेल्या बबिता तिरपुडे गेली होती. बबिता हिचा 28 एप्रिलला रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला होता. डोक्यावर काठी मारुन आणि गळा दाबून तिचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले होते.
याप्रकरणी कारधा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत चौकशी केली. याप्रकरणी आरोपी राजहंस कुंभरे याने मृत बबिता तिरपुडे हिने जादूटोणा केल्यामुळेच त्याची पत्नी मायाबाई हिचा मृत्यू झाला, या संशयाचा मनात राग धरुन बदला घेण्यासाठी बबिता तिरपुडे हिचा खून विनोद रामटेके याच्या मदतीने केल्याची कबुली त्याने दिली आहे. दोन्ही आरोपींना कारधा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात यांनी दिली.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.