सिंदेवाही : शहरातील बस स्थानक परिसरात उष्माघाताने ४२ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार १७ मे च्या दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.सविस्तर वृत्त असे की मृतक प्रल्हाद वसंता आत्राम (४२) राहणार भुज, तालुका ब्रह्मपुरी हा आपल्या वैयक्तिक कामाकरीता सिंदेवाही शहरामध्ये आला असता तो दुपारच्या सुमारास शहरातील बस स्थानक परिसरात मृतावस्थेत आढळून आला. नागरिकांनी याची माहिती सिंदेवाही पोलीस स्टेशनला दिली. उष्माघाताने त्याचा मृत्यू झाला असावा असे नागरिकांत बोलले जात आहे. याप्रकरणी सिंदेवाही पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार योगेश घारे करीत आहेत.
सिंदेवाही बस स्थानक परिसरात उष्माघाताने ४२ वर्षीय इसमाचा मृत्यू | Batmi Express
मे १८, २०२२
0
सिंदेवाही : शहरातील बस स्थानक परिसरात उष्माघाताने ४२ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार १७ मे च्या दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.सविस्तर वृत्त असे की मृतक प्रल्हाद वसंता आत्राम (४२) राहणार भुज, तालुका ब्रह्मपुरी हा आपल्या वैयक्तिक कामाकरीता सिंदेवाही शहरामध्ये आला असता तो दुपारच्या सुमारास शहरातील बस स्थानक परिसरात मृतावस्थेत आढळून आला. नागरिकांनी याची माहिती सिंदेवाही पोलीस स्टेशनला दिली. उष्माघाताने त्याचा मृत्यू झाला असावा असे नागरिकांत बोलले जात आहे. याप्रकरणी सिंदेवाही पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार योगेश घारे करीत आहेत.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.