सिंदेवाही : तालुक्यातील चिकमारा गावात घरात घुसून पट्टेदार वाघाने एका झोपलेल्या वयोवृद्ध महिले वर हल्ला केला त्या हल्यात महिला ठार झाल्याची घटना 28 एप्रिल गूरूवार ला रात्रौ १ वाजता च्या सुमारास उघडकीस आली आहे.मृतक महिले चे नाव तुळसाबाई परसराम पेंदाम वय 89 रा.चिकमारा तालुका सिंदेवाही असे असून हे महिला घरात झोपले असता रात्री साडेबारा वाजता एका पट्टेदार वाघाने ठार केले हे माहिती पोलीस स्टेशन सिंदेवाही मिळताच पोलिस स्टेशनचे ठाणेदार घारे, गेडाम, पो.ह.वा गेडेकर, राहुल रहाटे दाखल झाले घटनेचा पंचनामा करीत असून पुढील तपास करीत आहेत.
सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात मानवी जीवन धोक्यात आले असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.याअगोदर सुद्धा पवनपार, सरडपार चक येथे गावात येऊन बिबट्या ने माणसाला ठार केले होते.वांरवार गावात येऊन बिबट व वाघ हल्ले करत असल्याने जंगल शेजारी असलेल्या गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.