गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील सर्व प्राचार्य, पदव्युत्तर विभागप्रमुख विद्यार्थी तथा संबंधितांना कळविण्यात येते की, विद्यापीठाच्या शैक्षणीक सत्र २०२१-२२ मधील दि. ०९/०२/२०२२ रोजीपर्यंत संपन्न झालेल्या हिवाळी २०२१ च्या परीक्षेतील सर्व विद्यार्थ्यांच्या उन्हाळी-२०२२ च्या लेखी परीक्षा दि. ०१/०६/२०२२ रोजी पासून संबंधित अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकानुसार ऑफलाईन MCQ पध्दतीनुसार घेण्याचे ठरविण्यात आलेले आहे. ( Read Full News IST 4/22/22 5:27 PM )
अभ्यासक्रम कमी; मग परीक्षा MCQ पद्धतीनेच घ्या - विद्यार्थ्यांची मागणी |
शाळा महाविद्यालय उशिरा सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण कमी झाल्याने ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यार्थ्याना अभ्यासक्रम कमी करून परीक्षेचा तान कमी होऊन विद्यार्थ्यांस मदत होईल. कोरोना काळात बस सेवा परिपूर्ण बंद होती. जवळील विद्यार्थी कॉलेजला पोहचले पण ज्याच्याकडे साधन नव्हतं असे विध्यार्थी एप्रिल महिन्यापासून पासून कॉलेजला पोहचले. १ महिना कॉलेज मध्ये गेलं असावा त्यात अभ्यासक्रम पूर्ण शिकवण्यात आलंच नाही.
राज्यात पुन्हा कोरोनाची वाढ होऊ लागली आहे. कोरोना वाढ बघून राज्यात पुन्हा मास्क सध्या गर्दी, दवाखाना, ट्रेन अशा ठिकाणी अनिवार्य करण्यात आलं आहे. गोंडवाना विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि भविष्यासोबत खेळणे बंद करावे. पाठयक्रम पूर्ण शिकवण्यात आलंच नाही मग परीक्षा ऑफलाईन का?
जवळील विद्यार्थ्यांच पाठयक्रम 50% च्या जवळपास तर मागील महिन्यात आलेल्या विद्यार्थ्यांच अभ्यासक्रम 30% च्या खालीच आहे.
मागील महिन्यात गेल्याला विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल रेकॉर्ड बुक, असाइनमेंट आणि स्किल इंहसमेंट प्रोजेक्ट लिहायच आहे. अशा विद्यार्थ्यांकडे वेळ आहे किती ?
पाठयक्रम BSC - 6 विध्यार्थाना गणिताचा सेकंड पार्ट मिळालाच नाही?
जर अशा परिस्थिती पेपर ऑफलाईन लेखी पद्धतीने झालं तर निश्चितच गोंडवाना विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि भविष्यासोबत खेळू शकतो. गोंडवाना विद्यापीठाने १ जुन पासून सुरु होणारी परीक्षा ऑफलाईन MCQ पद्धतीने घेण्यात यावे.