मुंबई: रोहित शर्मा फाइन ( Rohit Sharma Fine ) : आयपीएल 2022 चा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी दुःस्वप्नसारखा ठरत आहे. मुंबई इंडियन्सला आतापर्यंत झालेल्या पाचही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. बुधवारी पंजाब किंग्जनेही मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव केला.
पराभवानंतर रोहितचे लाखोंचे नुकसान झाले
या पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघ आणि कर्णधार रोहित शर्माचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला स्लो ओव्हर रेटसाठी 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच वेळी, मुंबई इंडियन्सच्या उर्वरित खेळाडूंना 6 लाख किंवा 25 टक्के मॅच फी यापैकी जे कमी असेल, दंड ठोठावण्यात आला आहे.
मुंबई इंडियन्सलाही शिक्षा झालीआयपीएल समितीने (आयपीएल) एक प्रेस विज्ञप्ति जारी करून लिहिले की, ‘आयपीएल आचारसंहितेच्या अंतर्गत हंगामातील हा संघाचा स्लो ओव्हर रेटच्या गुन्ह्यांशी संबंधित दुसरा गुन्हा आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला 24 लाख रुपये आणि उर्वरित प्लेइंग इलेव्हनला 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल तो दंड ठोठावण्यात आला आहे.
मुंबई इंडियन्ससाठी खडतर रस्ताआतापर्यंतचा 5 वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्ससाठी हा मोसम खूपच खराब ठरला आहे. मुंबई इंडियन्सला 5 पैकी सर्व 5 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी मुंबई इंडियन्सला आता नऊपैकी आठ सामने जिंकावे लागतील. बुधवारी झालेल्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सला सलग पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पंजाबने मुंबईला 199 धावांचे लक्ष्य दिले होते, पण ते ते गाठू शकले नाही आणि सामना 12 धावांनी गमावला.