नक्षल्यांनी केलेल्या हत्या मधील एक ग्रामस्थ दलसु हिचामी हा झारेवाडा येथील पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून झाल्याची प्राथमिक असून दुसरा आत्मसमर्पित नक्षली नवीन उर्फ अशोक पेका नरोटी याची गोलगट्टा येथे दगडाने डोके ठेचून हत्या केल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.
काल दुपारी 2 वाजता सुरजागड लोहखनिज टेकड्यांवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहिर कार्यक्रम झाले. या कार्यक्रमाचा 12 तासांचाकालावधी उलटण्याआधीच नक्षल्यांनी दोघांची हत्या करून आपला उपद्रव माजविल्याने पोलीस प्रशासनात खळबळ वाढली असून नक्षल आजच्या घडीला सुरजागड वादावरून अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. तसेच जिल्ह्यात सुरजागड वादावरून भयान परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदर घटनेबद्दल अधिक माहिती मिळविण्याकरीता व शोधमोहिम राबविण्यासाठी पोलीस विभागाने सुरजागड परिसरात मोठ्या संख्येने कुमक पाठवून नक्षल विरोधी अभियान तिव्र केल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र अजुनही पोलीस विभागाने या घटनेला दुजोरा दिलेला नाही.