'
30 seconds remaining
Skip Ad >

लोकांच्या जमावावर वाघ धावला तर दोघांना केले जखमी - Be Chandrapur

0

 

Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur News,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur Tiger Attack,

राजुरा:- आठवडा पासून धुमाकूळ घालित असलेला वाघ आजही गावालगतच्या झुडपात असल्याची माहिती मिळताच लोक वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करीत असताना चवताळलेल्या वाघाने जमावावर हल्ला चढवित दोघांना गँभिर जखमी केल्याची घटना आज दुपारी तोहोगाव येथे घडली सुदैवाने जीव हानी झाली नाही शरद बोपणवार राहणार तोहोगाव आणि सुरेश मत्ते राहणार विरुर स्टेशन असे जखमींची नाव आहे परंतु या घटनेनंतर जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असुन तात्काळ वाघाला जेरबंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वनविभागाला जनतेनी दिला आहे.

मागील आठवड्यापासून गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव ,आर्वी,वेजगाव परिसरात वाघाने गावालगतच धुमाकूळ घातला असून 5बैल,बकरी,मैस ठार केले आहे यामुळे जनतेत वाघाची दहशत असल्याने रात्र दिवस जागून काढीत आहे पोलीस व वनकर्मचारीही संयुक्त गस्त करीत आहेत परंतु वन विभागाने वाघाला जेरबंद करण्याची मोहीम गंभीरपणे घेतलेली नाही केवळ देखावा म्हणून एक पिंजरा लावण्यात आला तर मोजके ट्रॅप कॅमेरा लावून शेकी मिरवून घेत आहेत दरम्यान आज अकरा वाजेच्या सुमारास तोहोगाव आर्वी मार्गातील नाल्यालगतच्या झुडपात वाघ लपून बसल्याची वार्ता परिसरात पसरली जो तो वाघाला पाहण्यासाठी त्या स्थळी धाव घेतली वन कर्मचारी लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु लोक वाघाला हुसकावून लावण्यासाठी दगड मारू लागले आणि वाघ चवताळला व लोकांचे दिशेने हल्ला चढवीला यामूळे लोकांची धावाधाव झाली.
यात वाघाने हल्ला करून तोहोगाव येथील शरद बोपणवार,विरुर स्टेशन येथील सुरेश मत्ते यांना गँभिर जखमी केले जखमींना तात्काळ तोहोगाव आरोग्य केंद्रात उपचार्थ भरती केले आहे
या घटनेनंतर जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून तात्काळ वाघाला जेरबंद करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जनतेनी दिला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×