'
30 seconds remaining
Skip Ad >

बिग ब्रेकिंग! लाथाबुक्यांनी मारहाण; वेडसर इसमाचा मृत्यू - Be Chandrapur

0
Chandrapur,Chandrapur Crime,Chandrapur Crime Live,Chandrapur Live,Chandrapur Crime News,Chandrapur News,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Today,

चंद्रपूर
: पत्नीस मारहाण करण्याच्या उदेश्याच्या आलेल्या एका चाळीस वर्षीय वेडसर व्यक्तीस लाथाबुक्यांनी मारहाण करीत पलंगाला हातपाय बांधून ठेवल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवारी (12 एप्रिल) राजूरा येथे रमानगरात सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. सदर वेडसर व्यक्तीच्या मृत्यूस जबाबदार धरून दोन आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
नरेश गजभिये असे मृतकाचे नाव आहे. तर विठ्ठल आगलावे व प्रदीप माणुसमारे असे आरोपींचे नाव आहेत. दोन्ही आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजूरा शहरातील रमानगरात नरेश गजभिये हा आपल्या आईसह राहत होता. तो वेडसर असल्याने शिविगाळ व मारहाण करायचा. दोन तिन दिवसांपासून सदर इसम हा शेजारील आशा आगलावे ह्यामहिलेसोबत शिविगाळ करून भांडण करीत होता. काल मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास परत त्या महिलेला शिविगाळ करू लागला. तो ऐवढ्यावरच थांबला नाही तर तिच्या घराकडे जावून मारहाण करण्याचा प्रयत्न करीत होता. सदर महिलेने पतीस घरी बोलावून घेतल्याने त्याला मारहाण करण्यापासून अटकाव करण्यात आले. त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु तो न मानता शिविगाळ करीत असल्याने आरोपी विठ्ठल आगलावे याने दुसरा आरोपी प्रदीप माणुसमारे यांचे मदतीने त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यांनतर त्याचेच घरी पलंगाला दोराने बांधून ठेवण्यात आले. त्यांनतर त्याच्या विरोधात आरोपी हे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करायला आले. दहा ते पंधरा मिनीट ठाण्यात बसून असतानाच त्या वेडसर इसमाचा मृत्यू झाल्याची बातमी पोलिस ठाण्यात आली. लगेच सहायक पोलिस निरीक्षक साखरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. सदर इसम हातपाय बांधलेल्या स्थितीत मृतावस्थेत आढळून आला.
सदर वेडसर इसमाच्या मृत्यू प्रकरणात आरोपी विठ्ठल आगलावे व प्रदीप माणुसमारे यांचे विरोधात भांदवी 304, 34 सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. मृतकाच्या पश्चात आई आहे. दोघेही एकत्र राहत होते. आज बुधवारी दोन्ही आरोपींचा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांचीही कारागृहात रवानगी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×