अमरावती : वनविभागातील वरिष्ठ पदावर असणाऱ्या एका महिला अधिकारीने अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे मी आत्महत्या करीत असल्याच्या सुसाईट नोटने अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली होती. ही सुसाईड नोट वनविभागाच्या एका सहायक वनसंरक्षक पदावर असणाऱ्या एका महिला अधिकारीने व्हॉटसअप समुहावर टाकली आणि काही वेळात डिलीट सुध्दा केली. तसेच, या कृतीबद्दल माफी सुध्दा मागितली. परंतु, तत्पूर्वीच ही सुसाईट नोट अनेकांच्या मोबाईलवर पोहोचून व्हायरल झाली. त्यामुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आला. वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे आरएफओ दिपाली चव्हाणने आत्महत्या केल्याची घटना वर्षभरापूर्वी घडली होती. त्यामुळे या सुसाईट नोटने वनवर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
माझ्या चुकीबद्दल फाशीची शिक्षा
एसीएफ महिला अधिकारी यांनी दिड पानाची सुसाईट नोट लिहून ठेवली होती. ८ एप्रिल रोजी रानगव्हाने एका आदिवासी इसमाला गंभीर जखमी केल्याची माहिती रात्री साडेदहाच्या सुमारास मिळाली होती. त्यानंतर मुलगा मोबाईल खेळत असल्यामुळे स्विच ऑफ झाला. त्यामुळे रात्री वरिष्ठ अधिकाऱ्याशी संवाद झाला नाही. परंतु, याविषयी माफी मागितल्यानंतरही वरिष्ठ अधिकारी यांनी व्हॉटसअप ग्रुपवरच अपमानास्पद बोलले. तसेच, कार्यालयात बोलावून लिपिक व लेखापालासमोर दमदाटी सुद्धा केली. हा मानसिक त्रास सहन होत नाही. माझ्या चुकीबद्दल फाशीची शिक्षा करून घेत आहे. माझ्या मुलांची काळजी घ्यावी, असे त्या सुसाईट नोटमध्ये लिहीले होते.
अभिप्राय मागितला आहे – जी.के. अनारसे, वनसरंक्षक (प्रादेशिक)
सुसाईड नोट संदर्भात माहिती मिळाली होती. या अनुषंगाने चौकशी केली असता, संबधित महिला अधिकारी यांनी माफी देखील मागितली आहे. दोन्ही महिला अधिकाऱ्याचा अभिप्राय मागितला असून, त्यांना समक्ष बोलावून विचारपूस करू.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.