- 14 Apr 2022 11:02 AM (IST)
विजय वडेट्टीवारांकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर (Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar ) यांची आज जयंती आहे, या निमित्ताने ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार (OBC Minister Vijay Wadettiwar ) यांनी दीक्षाभूमी ( Deekshabhoomi ) येथे येऊन भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यावेळी युथ काँग्रेसच्या नेत्या शिवाणी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar ) याही उपस्थित होत्या. शिवाणी वडेट्टीवार यांनीही बाबासाहेबांना अभिवादन केलं.
“बाबासाहेब यांनी संत तुकाराम महाराज, कबीर आणि महात्मा फुले यांना गुरु मानलं होतं. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर हा देश चालतोय, आणि संविधानामुळेच लोकशाही जीवंत आहे, कुणीही कितीही जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरीही संविधानामुळे हा देश मजबूत आहे” अशी भावना यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.