आज कर्मवीर कन्नमवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय सुरबोडी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विद्यालयाचे प्राचार्य श्री कऱ्हाडे सर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून हार केले. सोबतच संस्थेचे सहसचिव तथा माजी प्राचार्य श्री संजय भाऊ धोटे सर यांनी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतड्याला माल्यारपण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाचे वेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. Q
या प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर विद्यालयाचे प्राचार्य श्री कऱ्हाडे सर यांनी प्रकाश टाकला. मा.धोटे सर यांनी आजच्या काळात प्रत्येकाने आपल्या जीवनात बाबासाहेबांचा आदर्श घ्यावा आणि त्यांनी दिलेल्या मुल मंत्राचा म्हणजेच शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करीत राहा असे प्रतिपादन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन श्री. बगमारे सर यांनी तर आभार श्री. पिलारे सर यांनी मानले .