'
30 seconds remaining
Skip Ad >

नागपूर शहरात उष्माघाताचे दोन बळी तर विदर्भातील वाढत तापमान ठरतंय जीवघेण - Batmi Express

0

Nagpur,Nagpur LIve News,nagpur news,Nagpur Today,Nagpur Marathi News,

नागपूर
: भारतीय हवामान विभागाच्या (Indian Meteorological Department) अहवालानुसार एप्रिलमध्ये तापमान वाढते. तर, ४०-४२ डिग्री सेल्सिअसवरून ते ४५-४६ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचते आहे. रात्रीचे तापमान २२ ते २६ डिग्री सेल्सिअसपर्यंत असते. तर, दिवसा याच तापमानात वाढ होते. तर, आता एप्रिल प्रमाणेच मे महिनाही तापणार आहे.

Most Read News

विदर्भात (Vidarbha) इकडे उन्हाची लाट (Heat Wave) असताना अवकाळी पावसाचीही (Rain) शक्यता वर्तविण्यात येत आहे. मंगळवारी काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान खात्याने दर्शविली आहे. तर, या उन्हाच्या लाटेने शहरात दोघांचा बळी (Death) घेतला आहे. यावरून या लाटची तीव्रता जीवघेणी ठरू लागली आहे.

Most Read News

ऊन सहन न झाल्यामुळे या उन्हाळ्यात प्रथमच दोघांचा जीव गेला आहे. शनिवारी दुपारी दोघेही बेशुद्धावस्थेत सापडले. एक ४५ वर्षीय व्यक्ती संविधान चौकात, तर दुसरी व्यक्ती ३५ वर्षांची कॉटन मार्केट परिसरात बेशुद्धावस्थेत आढळून आले. पोलिसांनी दोघांनाही मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर, उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×