'
30 seconds remaining
Skip Ad >

भयंकर.. गोंदियात अर्धनग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह, चेहरा जाळून ओळख मिटविण्याचा प्रयत्न - Be Network

0

Gondia,Gondia Crime,Gondia Live News,Gondia Marathi News,gondia news,Gondia Murdered,Murdered,

आज सकाळी कुंभारटोलीचे काही जण जंगलात सरपणासाठी गेले होते. तेव्हा त्यांना तिथं अर्धनग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह सापडला. ही घटना पाहून त्यांना धक्काच बसला. शेवटी त्यांनी या घटनेची माहिती आमगाव पोलिसांना दिली. 

गोंदिया :- जिल्ह्यातील आमगाव तालुक्या अंतर्गत कुंभारटोली लगत (Kumbhartoli) जंगल परिसर आहे. या परिसरात एका पंधरा-सोळा वर्षीय तरुणीचा आज सकाळी मृतदेह सापडला. चेहरा जाळून तिची ओळख मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मृतदेह जंगल परिसरात फेकून देण्यात आला. आज सकाळी कुंभारटोली गावातील काही लोक जंगल परिसरात सरपण वेचण्यासाठी गेले होते. गावकऱ्यांना युवतीचा मृतदेह दिसला. घटनेची माहिती आमगाव पोलिसांना (Amgaon Police) दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनाकरिता आमगावचे ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) पाठविले. ही घटना काल रात्री घडली. काही अज्ञान इसमांनी या तरुणीवर अत्याचार केला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर पळ काढला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आमगाव पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.


अशी उघडकीस आली घटना:

आज सकाळी कुंभारटोलीचे काही जण जंगलात सरपणासाठी गेले होते. तेव्हा त्यांना तिथं अर्धनग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह सापडला. ही घटना पाहून त्यांना धक्काच बसला. शेवटी त्यांनी या घटनेची माहिती आमगाव पोलिसांना दिली. आमगाव पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

जंगलात फेकला मृतदेह:

या घटनेचा तपास करण्यासाठी श्वानपथक बोलावण्यात आलंय. गुन्हे शाखेचे पोलीस गोंदियावरून आले आहेत. आरोपींनी तिची हत्या केल्यानंतर तिचा चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला. काल रात्रीच ही धक्कादायक घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही तरुणी कुठली आहे. तिची हत्या का करण्यात आली, हे सर्व प्रश्न सध्यातरी निर्माण झाले आहेत. आमगाव पोलीस याचा तपास करत आहे. कुठल्या पोलीस ठाण्यात तरुणीची मिसिंग तक्रार आहे का, याची माहिती मागविली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×