राजस्थानमधील झुंझुनू येथील नवलगढ पोलीस स्टेशन परिसरात सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. दोन सख्ख्या बहिणी वर सात तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर धाकटी बहीण गरोदर राहिली. याप्रकरणी पीडितेच्या भावाने सात तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या भावाने सांगितले की, गेल्या दीड वर्षांपासून हे आरोपी त्याच्या बहिणींवर बलात्कार करत होते. आरोपीने आधी मोठ्या बहिणीचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवला. नंतर त्याला व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले.
नुकतेच 23 एप्रिल रोजी लहान बहिणीच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबीयांना ही बाब समजली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध पॉक्सो कायदा आणि एससी-एसटी कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.