'
30 seconds remaining
Skip Ad >

अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार करणा-या आरोपीस अटक, पिडिता दोन महिन्याची गर्भवती राहिल्यावर प्रकार उघडकीस

0

Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News,Chandrapur Today,Chandrapur Crime,


चंद्रपूर : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला रामनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. कैन्हया उर्फ अजय मानकर (२१) रा. तुकूम चंद्रपूर असे अटकेतील आारोपीचे नाव आहे. आरोपी अजय हा कुलर दुरुस्तीचे काम करतो. पिडितेच्या घरी त्याने कुलर दुरुस्तीचे काम केले. यावेळी त्याने पिडीत मुलीशी जवळीक निर्माण केली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमसंबंधातून दोघांत शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.

दरम्यान, पिडित मुलगी दोन महिन्याची गर्भवती राहिली. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात आल्यावर पिडीत मुलीने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितले. याबाबत कुटुंबीयांनी रामनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भादंविच्या विविध कलम तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पुढील तपास भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे, एनपीसी श्रीदेवी पवार करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×