ब्रम्हपुरी ब्रेकींग न्यूज:- वाघाच्या हल्यात शेतकरी ठार - Batmi Express

Bramhapuri,Bramhapuri Live,Bramhapuri News,Tiger Attack,Chandrapur Tiger Attack,Chandrapur,

Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Live,Tiger Attack,Bramhapuri News,Chandrapur Tiger Attack,ब्रम्हपुरी दि १७ एप्रिल: आवळगाव येथील वाघाच्या हल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना १६ एप्रिल रोज शनिवारला सायंकाळी अंदाजे चार ते पाच च्या दरम्यान घडली आहे.

सविस्तर वृत्तांत असे आहे की, तूळशीराम सुकर कांबळी (६७) हे आपल्या दैनदिनप्रमाणे शेतामध्ये उन्हाळी धान व मिरची च्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाऊन वाकून पाणी देत असतांना आधीच शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घातली आणि त्या झडपेत काही कळण्याआधीच शेतकरी तुलसीराम कांबळी हे गतप्राण झाले.

त्यानंतर वाघाने मृतक शेतकऱ्याला मिरचीच्या शेतातून जवळपास २०० ते ३०० मीटर ओढत वैनगंगा नदी किनारी घनदाट गवतात नेऊन ठेवले.
सदर मृतक शेतकरी हा काही तासाआधी आपल्या मुलीच्या सासरी तेलीमेंढा या गावावरून भेट घेऊन स्व गावी आला आणि लगेच - शेतावर निघून गेला आणि वाघाचा बळी ठरल्याने गावात एकच शोककुळ वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती वनविभागा ला माहिती होताच पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ब्रह्मपुरी येथे रात्रिच हलविण्यात आले. या वेळी घटनास्थळी ब्रह्मपुरी चे ठाणेदार रोशन यादव हे आपल्या कर्मचारीसह उपस्थित होते.
सदर मृतक व्यक्तीवर हल्ला करण्याअगोदर त्या नरभक्षक वाघाने होमराज सातपुते याच्या शेळीवर हल्ला करून जखमी केले होते. सकाळपासूनच बोधना घाटावरच्या रस्त्यावर वाघ ठान मांडून बसलेला होता असे ह्या रस्त्यावरून जाणारे येणारे शेतकरी सांगत होते.

मृतक व्यक्तीच्या पछात्य  दोन मुले ,दोन सून, दोन नातवंडे  असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. मृतकाच्या कुटुंबीयांच्या परिवाराला तात्पुरती आर्थिक मदत उपविभागीय वनाधिकारी, ब्रह्मपुरी महेश चोपडे, आवळगाव चे वनक्षेत्र सहाय्यक ए. पी. करंडे, वनरक्षक एल. सातपुते यांनी वीस हजार रुपये दिले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.