सावधान! मित्रांनो भर उन्हात वरातीमध्ये नाचू नका.. एकाचा झाला मृत्यु - Batmi Express

Be
0

Parbhani,Parbhani News,Maharashtra,

परभणी : राज्यात उष्णतेची लाट दिसून येत आहे. पुढील उष्माघाताची लाट असणार आहे. विदर्भात उन्हाचे अधिक चटके बसतील अशी स्थिती राहणार आहे. दरम्यान, परभणी, अमरावती, नागपूर येथे उष्णतेचा कहर दिसून येत आहे. परभणीत लग्नाच्या वरातीत उष्माघाताने तरुणाचा मृत्यू झाला आहे. भर उन्हात वरातीत नाचल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. परभणीत तापमानाचा पारा 41 अंशावर पोहोचला आहे.


परभणी जिल्ह्यात मित्राच्या लग्न वरातीत नाचून थकलेल्या एका युवकाने थंड पाणी पियाल्यानंतर त्याला उलट्या होऊ लागल्या. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जिंतूरच्या सराफा व्यापारी धनंजय शहाणे यांचा मुलगा सोहम हा मित्राच्या लग्नासाठी भर दुपारच्या उन्हात मोटारसायकलवरुन परभणीत मित्राच्या लग्नाला आला होता.

लग्न वरातीत नाचल्यानंतर तो काहीसा थकला. तहान लागल्याने त्याने थंड पाणी घेतले. मात्र अचानक त्याला उलटी झाली. त्याला परभणी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे सोहम याचा मृत्यू झाला. सध्या परभणीत तापमानाचा पार 41 अंश इतका आहे. भर उन्हात नाचल्याने उष्माघातानेच सोहमचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->