गोंदिया: दुचाकीवर लिफ्ट घेणे पडले महागात ! आढळला बहिणीचा मृतदेह, रोख रक्कमेसह दागिने बेपत्ता - Batmi Express

Gondia,Gondia Live News,gondia news,Gondia Marathi News,Gondia Crime,Maharashtra,crime,crime news,

Gondia,Gondia Live News,gondia news,Gondia Marathi News,Gondia Crime,Maharashtra,crime,crime news,

गोंदिया
: भावाच्या लग्न कार्यासाठी अनोळखी व्यक्तीच्या दुचाकीवर बसून जात असलेल्या बहिणीचा मृतदेह बटाणा शिवारात रविवारी  (ता.१७) आढळला. तिच्याकडे असलेले दहा हजार रुपये रोख आणि दागिने देखील बेपत्ता असल्यामुळे तिची हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ललिता किरण गेडाम (वय ५०) असे या महिलेचे नाव असून ती तालुक्यातील छिपिया येथील रहिवासी आहे.

ललिता गेडाम रविवारी आपल्या घरून आंभोरा येथे भावाकडे आयोजित लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी म्हणून अनोळखी इसमाच्या दुचाकीवर बसून निघाली होती. परंतु, ती आंभोरा येथे न पोहचता बटाना शिवारातील बटाना – मुंडीपार मार्गावर मृतावस्थेत आढळली. सदर दुचाकी चालकाची अजूनही ओळख पटली नसून सदर महिलेजवळ असलेले रोख दहा हजार रुपये आणि दागिने बेपत्ता असल्यामुळे महिलेचा अपघात नसून तिची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप मृतकाच्या घरील मंडळींनी लावला आहे. सदर घटना अपघात की हत्या याविषयी परिसरात चर्चेला उधाण आले असून सदर घटनेची नोंद गोंदिया ग्रामीण पोलिसांनी केली, असून पुढील तपास ग्रामीणचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.