चामोर्शी : तालुक्यातील कुनघाडा रै. व उपक्षेत्र जोगना अंतर्गत येणाऱ्या नियत क्षेत्र कुथेगाव कक्ष क्रमांक 41 च्या जंगल परिसरात चितळाची शिकार करण्यात आली या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून इतर चार आरोपी फरार आहेत. सदर कारवाई 11 एप्रिल रोजी करण्यात आली. आकाश मुन्ना भांडेकर, दुर्योधन लहु भांडेकर दोन्ही रा. कुथेगाव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मुन्ना मारोती भांडेकर, नरेश मारोती भांडेकर, चेतन मुन्ना भांडेकर, संदीप सनकु हिचामी सर्व रा. कुथेगाव अशी फरार आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनूसार, कुथेगाव जगल परिसरात चितळाची शिकार करुन गावात मास आणल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली असता. मिळालेल्या माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्राधिकारी महेशकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनात वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने कुथेगाव येथे धाड टाकून आकाश भांडेकर व दुर्योधन भांडकर यांच्या घरून चितळाचे मास भांडयासह जप्त केले. व दोघांनाही ताब्यात घेवून अटक केली. तर इतर चार आरोपी फरार असून त्यांचा शोध घेणे सुरु आहे. सर्व अरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या मार्गदर्शनाखाली व वनपरिक्षेत्राधिकारी महेशकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्रसहायक व्ही.एम. चांदेकर, क्षेत्रसहायक एस. एम. मडावी, वनरक्षक एन.बी.गोटा, वनरक्षक ममता देव्हडे व इतर कर्मचारी करीत आहे.