बिग ब्रेकिंग: ब्रम्हपुरी -आरमोरी मुख्य महामार्गावर कांदा भरलेल्या टिप्परची ट्रकला मागेहुन धडक.! 3 जण गंभीर जखमी - Be Chandrapur

Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Accident,Bramhapuri Live,Bramhapuri News,Armori,Armori Live,Armori News,Accident News,Bramhapuri Corona,Chandrapur Ac

Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Accident,Bramhapuri Live,Bramhapuri News,Armori,Armori Live,Armori News,Accident News,Bramhapuri Corona,Chandrapur Ac

ब्रम्हपुरी
:- आरमोरी - ब्रम्हपुरी मुख्य महामार्गावर आज दिनांक:- १५/४/२०२२ ला ६ ते ७:०० वाजताच्या सुमारास कांदा भरलेल्या टिप्परची ट्रकला मागेहुन धडक दिल्याने तिन जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे.

सविस्तर वृत्तांत असे आहे की, नागपुर वरून कांदा भरून MH. 28.BB 8396 या क्रमांकाची टीप्पर येतं असतांना किराणा सामान भरलेल्या रस्त्याच्या बाजूला ट्रॅक क्र. MH. 49.AT.8344 उभा होता. तेव्हा नागपुर हून कांदा भरून येत असलेल्या टिप्परने उभा असलेल्या ट्रॅकला मागेहून जब्बर धडक दिली त्यामध्ये टीप्परचा समोरील भागाचा चेंदामेंदा झाला. त्यामूळे कांदा भरलेल्या टीप्परच्या समोरील भागात बसलेल्या  वाहन चालक व वाहन स्वाराच्या पायाला जब्बर मार लागल्याने गंभीररित्या जखमी झाले.त्याना उपचाराकरिता ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात नेण्यात आले.
वृत्त लिहीपर्यंत जखमी ची ओळख अजुनही पटली नसुन घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस विभााग करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.