भंडारा : भंडारा जिल्ह्यात एक अत्यंत धक्क्कादायक घटना घडली होती. मतिमंद पीडित महिलेवर अत्याचार झाला होता. पीडितेने बलात्काराच्या घटनेतून मुलीला जन्म दिला. परमानंद मेश्राम यांनी पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच पीडित मुलीचे प्राण वाचविण्यासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात तिला दाखल करून तिच्यावर उपचार केले. पीडितेने २० नोहेंबर २००८ ला एका मुलीला जन्म दिला. आरोपी विरुद्ध लाखनी पोलीस ठाण्यात बलात्कारचा गुन्हा दाखल झाला होता. तर, आरोपीला या प्रकरणात ७ वर्षांची शिक्षा भोगली तर अखेर त्याला जामीन मिळाला. या दरम्यान आरोपीचा लाखनी येथेच मृत्यू झाला.
पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी परमानंद मेश्राम यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. १२ डिसेंबर २०१२ ला भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर ढिवर समाजाच्या वतीने पारंपरिक वेशभूषेत अर्ध नग्न मोर्चा सुद्धा काढला होता. या सर्वांचे फलित असे की, तर, आता या घटनेला १३ वर्षे ४ महिने म्हणजे १६० महिने गुणिले ५ हजार रुपये म्हणजे ८ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यास सांगितले आहे. तसेच, आरोपीच्या कुटुंबीयांनी हे पैसे देण्यास नकार दिला तर, आरोपीची अचल संपत्तीचा लिलाव करून पीडितेला तिचा हक्क दिला जाणार आहे.
कशी घडली नेमकी घटना ?