Maharashtra School: राज्यातील शाळांना 2 मे ते 12 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी, विदर्भातील शाळा 27 जूनपासून होणार सुरु - Batmi Express

Maharashtra School,Education,Education News,Maharashtra School Live Update,Mumbai,Mumbai News,Mumbai Live,mumbai news live,mumbai news today,

Maharashtra School,Education,Education News,Maharashtra School Live Update,Mumbai,Mumbai News,Mumbai Live,mumbai news live,mumbai news today,

Maharashtra School
यावर्षी शाळांना उन्हाळ्याची सुट्टी मिळणार नाही, या कल्पनेनं हिरमुसलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.  राज्यातील शाळांना 2 मे पासून सुट्टी  जाहीर झाली असून ही सुट्टी 12 जूनपर्यंत असणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 13 जूनपासून सुरु होणार आहे. तर, विदर्भातील शाळा मात्र उन्हाळ्याची तीव्रता पाहता 27 जून पासून सुरु होणार आहे.

कोरोनामुळे मर्यादित वेळेत ऑनलाइन भरलेल्या वर्गांमुळे नियमित अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर पहिली ते बारावीच्या मुलांना उन्हाळी सुट्टी मिळेल का, अशी धाकधूक होती.

मात्र नियमित अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करून शाळांना 2 मे ते 12 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उन्हाळय़ाची तीव्रता पाहता विदर्भातील शाळा 27 जूनपासून सुरू होणार आहेत. दरम्यान, नवीन शैक्षणिक वर्ष 13 जूनपासून सुरू होणार आहे.

हे सुद्धा वाचा

कोरोनाच्या संकटामुळे शालेय विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळी सुट्टय़ा रद्द करून एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे विद्यार्थी आणि पालक नाराज झाले होते. त्या पार्श्वभूमीवर शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उन्हाळय़ाची दीर्घ सुट्टी कमी करून या सुट्टय़ा दिवाळी, गणेशोत्सव किंवा नाताळसारख्या सणांवेळेस देता येणार आहेत. या सुट्टय़ा देण्याचा अधिकार स्थानिक शिक्षण अधिकाऱयांना असणार आहेत. मात्र या सुट्टय़ा देताना त्या 76 दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागणार आहे. प्राथमिक आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या संचालकांनी हे आदेश दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.