चंद्रपूर : कार-दुचाकीचा अपघातात तीन वर्षीय मुलीचा दुदैवी मृत्यू झाला. तर उपचारा दरम्यान एका महीलेची प्राणज्योत मावळली. तर तिघे जण जखमी झाले आहेत. ही घटना घुग्घूस - चंद्रपूर मार्गावरील चिंचाळा येथील हनुमान मंदिरा जवळ घडली. चारवी चंदु पिल्ले, लहाणुबाई पिल्ले असे मृतकांची नावे आहेत.
हे सुद्धा वाचा
प्राप्त माहीतीनुसार, चिमूर तालुक्यातील रामपूर येथून चिंचाळा येथे दुचाकीने एका कार्यक्रसाठी पिल्ले कुटूंबिय आले होते. कार्यक्रम आटोपून आज सोमवार दुपारी 4.15 वाजताचा दरम्यान गावाला जात असताना चंद्रपूर कडून घुग्घूसकडे जाणारी कार क्रमांक MH 29 AR 4549 ने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील चारवी चंदू पिल्ले वय 3 हीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झालेत.
जखमीना उपचारासाठी रूग्णालयात हालविण्यात आले. उपचारा दरम्यान लहाणूबाई तुकाराम पिल्ले वय 75 यांच्या मृत्यू झाला. मोरेश्वर सदाशिव पाटील, कु. सान्वी चंदू पिल्ले गंभीर जखमी झाले आहेत. पुढील तपास पडोली पोलीस करीत आहे.