चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील बोडधा येथील शेतकरी कवडू किसन मेश्राम वय 55 वर्ष हे काल दि.27 मार्च 2022 रोजी गावात एक लग्न कार्य असल्याने, लग्न कार्य आटपून नेहमी प्रमाणे दुपारी बैल धुवायला बोडधा येथील अमराई नदी घाटावर गेला होता.परंतु सायंकाळी बैल परत आले आणि कवडु मेश्राम रात्रौ. होऊनही परत न आल्याने गावकऱ्यांनी रात्रो बराच काळ शोधाशोध केली पण त्यांचा कुठेच पत्ता नाही लागला, आज परत गावकऱ्यांनी पहाटे पासून त्यांचा शोध घेतला असता वैनगंगा नदी घाटाला लागून असलेल्या बंडू पाटील ठाकरे यांच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळला, त्यांच्या शरीराचे नरभक्षक वाघांनी अनेक लचके तोडले होते.ही भयावह घटना बगून परिसरातील जनतेमध्ये फार मोठी दहशत निर्माण झाली आहे कारण याच घाटावरून अनेक लोक वसा मार्गे गडचिरोली येथे दररोज ये जा करतात तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतात उन्हाळी धानपिक व ईतर पिके घेतली जातात तसेच काही लोक रोजगाराचा दुसरा साधन नसल्याने मोह फुल वेचायला जातात आणि आता काही दिवसांनी तेंदू पत्ता संकलनाचे काम सुरू होणार आहे. परंतु या नरभक्षक वाघाच्या दहशतीने लोकान मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि या पुढे शेतात कसे जायचे हा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या अगोदर सुधा हळधा, बोडधा, मु डझा परिसरात वाघाच्या हल्यात अनेक लोक जखमी व मृत्यू झाले आहे. परंतु वण विभागाच्या वतीने या घटने कडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
हे सुद्धा वाचा
बोडधा परिसरातील या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करा अन्यथा या परिसरातील जनतेच्या वतीने किसान सभेच्या नेतृत्वात वनविभाग कार्यालय समोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा किसान नेते कॉ.विनोद झोडगे यांनी दिला आहे. यावेळी घटना स्थळावर वण विभागाच्या पूनम ब्राम्हणे मॅडम,ठाणेदार रोशन यादव, बोडधा येथील सरपंच सौ मनीषा झोडगे, तंटा मुक्तीचे माजी अध्यक्ष धनराज पाटील ठाकरे, मेंडकी पोलिस चौकीचे प्रकाश कावळे उपस्थित होते.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.