धक्कादायक! प्रेमीयुगलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या - Batmi Express

Nagpur,Nagpur Crime,Crime,Nagpur Suicide,Nagpur News,Nagpur Today,Nagpur Live

Nagpur,Nagpur Crime,Crime,Nagpur Suicide,Nagpur News,Nagpur Today,Nagpur Live

नागपूर:- आपल्या प्रेमाला घरची मंडळी समजू शकणार नाही, म्हणत त्यांनी घरातून पळ काढला. घरून निघून गेलेल्या तरुण व अल्पवयीन मुलीचा त्यांचे कुटुंबीय शाेध घेत असतानाच दाेघेही राेडने जात असल्याचे कुटुंबीयांना दिसले. त्यातच दाेघांनी कुटुंबीयांसमाेर शेतातील विहिरीच्या दिशेने धाव घेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. दाेघांचीही आपसात चांगली ओळखी असून, ते शुक्रवार (दि. २५) पासून बेपत्ता हाेते.

हे सुद्धा वाचा

महेश शालिक ठाकरे (वय २६) व तन्वी विठ्ठल चुटे (१६, दाेघेही रा. बेला, ता. उमरेड) अशी मृतांची नावे आहेत. महेश गुराखी हाेता, तर तन्वी बेला येथील तिडके हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकायची. दाेघेही दाेन वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात हाेते. ते शुक्रवारी कुणालाही न सांगता घरून निघून गेले हाेते. ही बाब लक्षात येताच दाेघांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शाेध घ्यायला सुरुवात केली.

महेशच्या कुटुंबीयांनी साेमवारी त्याचा शाेध बेलापासून तीन कि.मी.वर असलेल्या कुर्ला (ता. समुद्रपूर) शिवारात घेतला. दाेघेही त्यांना दुपारी एक वाजताच्या सुमारास राेडने जात असल्याचे दिसले. कुटुंबीयांना पाहताच दाेघांनी धावत जाऊन कुर्ला शिवारातील अक्षय जनार्दन कांबळे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेतली. त्यामुळे महेशच्या कुटुंबीयांनी तन्वीच्या कुटुंबीयांना व बेला पाेलिसांना माहिती दिली. समुद्रपूर पाेलिसांनी सायंकाळी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व दाेन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी समुद्रपूर पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.