Miss India Ranve Iconic 2022: कुमारी धनश्री दिनेश एकवनकर "मिस इंडिया" रणवे आयकॉनिक २०२२ ची विजेती
चंद्रपूर : अश्विनी एंटरटेनमेंट प्रस्तुत हंगाम ०६ मिस इंडिया रनवे आयकॉनिक 2022 (Miss India Ranve Iconic 2022 ) घेण्यात आली. या स्पर्धेत विविध शहरातून २७ मिस. नाशिक, दिल्ली, कानपूर, झाशी, आग्रा, भुवनेश्वर, कानपूर, लखनौ, चंद्रपूर अशा प्रकारे अनेक जिल्ह्यातून स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धकांमध्ये पाच टॉप मध्ये अंजली मेश्राम गडचिरोली, दिवानी कांबळे नागपूर, धनश्री एकवनकर चंद्रपुर, अंजू कुमारी बेहरा भुवनेश्वर, अक्ष्लेशा पाटील चंद्रपूर, यांची निवड करण्यात आली. अंतिम फेरीत तीन स्पर्धकांमध्ये कुमारी धनश्री दिनेश एकवनकर (Miss Dhanashree Dinesh Ekwankar ) मिस इंडिया रणवे आयकॉनिक 2022 (Miss India Ranve Iconic 2022 ) ची विजेती ठरली. सेकंड रनरअप अंजू कुमारी बेहरा, तर तिसऱ्या क्रमांकावर अक्ष्लेशा पाटील ही राहिली. यापूर्वी धनश्री मिस टिन कॉन्टिनेन्टल चंद्रपूरची 2021 विजेती राहिली . त्यानंतर मिस चंद्रपूर सेकंड रणरअप 2021ची विजेती ठरली. अशा बऱ्याच स्पर्धांमध्ये धनश्रीने आपले कौशल्य प्राप्त केले आहे. आता ती 2022 च्या मिस इंडिया आयकॉन स्पर्धेची विजेती ठरली.
या कार्यक्रमाचे आयोजन अश्विनी श्रीखंडे मॅडम ज्युरी, शुभम गोविंदवार ,वैभव कोमलवार, आदित्य टेकम, अभिलाष डाहुले यांनी केले होते. या स्पर्धेत विजेते होण्याचे श्रेय धनश्री एकवनकर हीने आई वडील, शिक्षकांसह मैत्रिणींना दिले आहे. पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ही देण्यात आले आहेत.