ब्रह्मपुरी:- लगतच असलेल्या बोंडे गाव (हुळकी) येथील गोपीचंद भाजीपाले वय (४५) या इसमाने २१ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घरच्या अंगणात असलेल्या कडू निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार मृतक गोपीचंद याला मोठ्या प्रमाणात दारूचे व्यसन होते घटनेच्या दिवशी सर्व कुटुंबातील व्यक्ती घरात झोपले होते. मात्र गोपीचंद एकटाच अंगणात झोपला होता शिवाय घरातील कोणती व्यक्ती बाहेर निघू नये म्हणून बाहेरून दरवाजा बंद करून साखळी लावली होती.
मात्र पहाटेच्या दरम्यान घरातील व्यक्ती झोपून उठल्यावर दरवाजा उघडत नसल्याने दरवाजा बाहेरून कोणीतरी लावल्याचे लक्षात येतात मृतक देवचंदच्या मुलाने घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तींना फोन करून बाहेरून कोणीतरी दरवज्याची साखळी लावली असल्याचे सांगितले वेळीच घराजवळील शेजाऱ्यांनी मृतकाच्या घरी येऊन दरवाज्याची साखळी काढले.
मात्र त्यांचा मुलगा बाहेर येताच त्याला त्याच्या वडीलाचे शरीर कडू निंबाच्या झाडाला लटकतांना आढळून आला लगेच त्यांनी ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली फिर्यादीच्या तक्रारीवरून घटनास्थळी येऊन पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मर्ग दाखल केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ब्रह्मपुरी येथील शासकीय रुग्णालयात पाठविला घटनेचा पुढील तपास ब्रह्मपुरी पोलिस करीत आहेत
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.