'
30 seconds remaining
Skip Ad >

ब्रम्हपुरी: धान खरेदी गोदामात आढळला इसमाचा मृतदेह, घात की पात ने मृत्यू..!

0
Bramhapuri,Bramhapuri Live,Bramhapuri News,Chandrapur,

नाटकाच्या थियटर्स मधून बाहेर पडला असावा.! नाटक समाप्त झाली. रात्र निघून गेल्यानंतर सकाळच्या सुमारास गावातिलच काही लोकांना विष्णू हा धान खरेदी गोदाम मध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला दिसला.

ब्रम्हपुरी:-तालुक्यातील बेटाळा गावामध्ये एका इसमाचा मृत्यू घात ने की पात ने झाला असल्याची घटना दिनांक:-२१/३/२०२२ ला घडली आहे. विष्णू लालाजी दिवठे वय वर्षे ५० असे घात की पात ने मृत्यू झालेल्या इसमाचे नाव असून बेटाळा गावातील रहिवासी आहे.

सविस्तर वृत्त असे की. दिनांक:- दिनांक:-२०/०३/२०२२ ला बेटाळा गावामध्ये होळीच्या पाडव्याल नाटकाचे आयोजन  करण्यात आले होते.  त्या नाटकाचे आयोजक विष्णू दिवठे हे होतें. नाटक सुरु झाल्यानंतर विष्णू हा रात्रौ २:३० वाजेपर्यंत नाटकाच कार्यक्रम बघण्याकरिता उपस्थिती असल्याचे गावामध्ये लोकचर्चा आहे.नंतर नाटकाच्या थियटर्स मधून बाहेर पडला असावा.! नाटक समाप्त झाली. रात्र निघून गेल्यानंतर सकाळच्या सुमारास गावातिलच काही लोकांना विष्णू हा धान खरेदी गोदाम मध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला दिसला. लगेच गावातील लोकांनी हि माहिती दिवठे कुटुंबाला दिली. दिवठे कुटुंब हे घटणा स्थळी दाखल झाले व तात्काळ ब्रम्हपुरी पोलिस विभागाला घटनेची माहिती दिली.

काही वेळातच ब्रम्हपुरी पोलिस विभागाचे अधिकारि कर्माचारी यानी धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या  विष्णूला ताब्यात घेतले व रूग्णालय येथे जिवंत आहे की मृत्यू झाला आहे याचा तपास करण्यात आला. तपसा अंती वैधकीय अधिकारी यांनी मृत घोषित केला. व उत्तरीय तपासणी करता हलिण्यात आले. उत्तरीय तपासणी करुन विष्णुच अंतविधी करण्यात आला.

मात्र अंताविधी झाल्यावर पोलिस विभागाने घटनेचा तपास जलद गतीने सुरुवात केली. चोख बंदोबस्त बेटाळा गावात लावण्यात आले आहे. कारण मृतक विष्णुच्या डोक्याला जब्बर मार असल्याने कानातून रक्त स्त्राव होत होता. विष्णु पडल्याने मृत्यू झाला असावा की कुणी डोक्यावर वार करुन हत्या केली असावी..? अशी शंका कुशंका गावामध्ये लोक चर्चेत आहे.

विष्णू नामक इसम गावांत होणाऱ्या सामजिक कार्यात सदैव  भाग असायचा मनाने प्रेमळ चार चौघांमध्ये जावून जनसमुदाया सोबत हितगुज साधायचा. गरीब परस्थितून कसा बसा धान खरेदीचा व्यवसाय सुरु केला. धान खरेदीतून काही मोबदला मिळून कुटुंबाचा उदर्निवाह करायचा.! नियतीला मान्य नसावे की कुण्या गाव गुंडाने घात केला असावा....? असा गंभिर प्रश्न दीवठे कुटूंब व गावं परीसरात चर्चा आहे.घात असेल तर पोलिस विभाग गुन्हेगाराचा शोध लावणार...?की.. तालुक्यामध्ये गुन्हेगारी मध्ये वाढ होणारं.! गुन्हेगारी मध्ये वाढ झाल्यास गावंगुंड तयार होउन सजलेल्या कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त करुन संसार उघड्यावर  आणणार..? असे नानाप्रकारचे विचित्र प्रश्न लोक चर्चेत येतं आहेत.
वृत्त लिहीपर्यंत विष्णू नामक इसमाचा घात आहे की पात आहे अजूनही गुलदस्त्यात आहे.
विष्णू नामक इसमाच्या जान्याने कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून गावं परीसर शोकसागरात बुडालेला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×