'
30 seconds remaining
Skip Ad >

IPL 2022: कोलकाता नाईट रायडर्सला मोठा झटका, स्पर्धेचे पहिले ५ सामने खेळू शकणार नाहीत हे दिग्गज क्रिकेटर - Batmi Express

0

IPL-2022, IPL2022,Sports,

आयपीएलचा १५ (IPL 2022) वा हंगाम येत्या २६ मार्चपासून सुरु होणार आहे. पहिल्याच दिवशी कोलकाता नाईट रायडर्स  (KKR)आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडणार आहेत. मात्र सामना काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना आता केकेआरला चांगलाच धक्का बसला आहे. कारण केकेआरचे पॅट कमिन्स (Pat Kamins) आणि ॲरॉन फिन्च (Aaron Finch) हे दोन दिग्गज खेळाडू सुरुवातीचे पाच सामने खेळू शकणार नाहीत.

ॲरॉन फिन्च आणि पॅट कमिन्स हे दोन्ही ऑस्ट्रेलियन खेळाडू सध्या पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात व्यस्त आहेत. हे दोन्ही खेळाडू आपला देश ऑस्ट्रेलियाकडून खेळत असून येत्या ५ एप्रिलपर्यंत हे दोन्ही खेळाडू पाकिस्तानमध्येच व्यस्त असतील. तोपर्यंत ते केकेआरकडून खेळू शकणार नाहीत. विशेष म्हणजे केकेआर फ्रेंचायजीने या दोन खेळाडूंसाठी तब्बल ९.७५ कोटी रुपये मोजलेले आहेत. लिलावात पॅट कमिन्सला ७.२५ कोटी रुपयांना खेरदी करण्यात आलेलं आहे. तर ॲलेक्स हेल्सने आयपीएल २०२२ मधून माघार घेतल्यानंतर ॲरॉन फिन्चला दीड कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलं होतं.

ते ५ एप्रिलनंतर भारतात येण्याची शक्यता आहे. केकेआर आपला पाचवा सामना १० एप्रिल रोजी  खेळेल. मात्र भारतात आल्यानंतर कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून दोन्ही खेळाडूंना काही काळासाठी बायोबबलपासून दूर राहावे लागणार आहे. त्यामुळे ५ एप्रिल रोजीच्या सामन्यात फिन्च आणि कमिन्स प्लेईंग इलेव्हनचा भाग होऊ शकणार नाहीत.

या दोन्ही खेळाडूंच्या उपस्थितीबद्दल केकेआरचे मार्गदर्शक डेविड हसी यांनी अधिक माहिती दिली आहे. “कोणत्याही सामन्यादरम्यान मजबूत संघ मैदानात उतरावा असं प्रत्येकाला वाटतं. मात्र प्रत्येक खेळाडू आपल्या देशाच्या संघासाठी खेळण्याला प्राधान्य देतो. प्रत्येक खेळाडूने तसं करण्यात काही गैर नाही. त्यामुळे फिन्च आणि कमिन्स भारतात येताच कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून मैदानात उतरतील,” असे डेविड हसी म्हणाले.

दरम्यान, फिन्च आणि कमिन्ससारखे दिग्गज खेळाडू ताफ्यात नसल्यामुळे चेन्नईचा सामना करण्यासाठी केकेआरपुढे मजबूत संघ तयार करण्याचे आव्हान असेल. यामध्ये कर्णधार श्रेयस अय्यरचाही कस लागणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×