औरंगाबाद : औरंगाबादमध्ये रेडिओलॉजिस्टचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या तरुणीनं सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली आहे. वैष्णवी काकडे असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. पप्पा, साधी एक परीक्षा मी पास होऊ शकत नाही, मला माफ करा' असं म्हणत तरुणीनं जीवन संपवलं आहे. औरंगाबादच्या कर्करोग रुग्णालयात बीएस्सी रेडिओथेरपीच्या तिसऱ्या वर्गात वैष्णवी शिक्षण घेत होती. वैष्णवीनं रेडिओलॉजिस्ट व्हावं असे तिच्या शेतकरी वडिलांचे स्वप्न होते. मात्र, अभ्यासात मागे पडत असल्यानं पित्याचे स्वप्न साकारु शकत नाही, असे तिला वाटू लागले. त्यामुळं तिने गळफास घेत आत्महत्या केली. तत्पूर्वी तिने आपल्या पित्याला चिठ्ठी लिहिली आहे.
वडिलांना लिहलेल्या चिठ्ठीत नेमकं काय म्हटलंय.
पहिले तर मी तुम्हाला Sorry म्हणते खूप खूप चुकीचा निर्णय घेतलाय मी, पण काय करणार खूप गरजेचा होता. खूप काही सहन केल होतं मी या मागच्या 3 वर्षापासून. तुम्ही मला बाहेर शिकायला पाठवलं. खूप पैसे पण लावले. जुम्ही तिकडे रात्रंदिवस शेतात काम करता आणि मी साधी एक परिक्षा पास नाही होऊ शकत. आता पण जे पेपर झाले त्यामध्ये पण मला काहीच लिहता आलं नाही. खूप वाईट वाटलं होतं मला. मी खूप प्रयत्न केले. अभ्यास करायचा पण नाही जमलं मला. खूप विश्वास होता ना पप्पा तुम्हाला माझ्यावर, पण मी विश्वासच तोडला तुमचा. तुम्हाला सोडून जाते आज. खूप दुःख होत रे पप्पा पण काय करू विलाज नाही काही माझ्याजवळ. हे सर्व सोडून घरी पण आले असते पण, अपमान सहन नव्हला होत. मी आज शेवटचा निर्णय घेऊन टाकला. मी माझ्या मनानं आत्महत्या करु लागल्याचे चिठ्ठीत लिहले आहे.
माझ्या आत्महात्येमागं काहीही कारण नाही आणि कोणाचा हातपण नाही. मलाच माझ्या जीवनाचा कंटाळा आला होता, म्हणून मी आत्महत्या करु लागले. रात्रंदिवस तोच तान होता. पास होईल का नापास होईल, रात्र रात्र झोप येत नव्हती. रात्र रात्र असं वाटत होत घरचे एवढे करतात आपल्यासाठी आपण काय करतो. रात्रंदिवस रडत होते पप्पा. कधीकधी तर अस वाटायचं सर्व काही माझ्याजवळ तरी पण...
मी माझ्या मनान मरत आहे तरी माझ्या मरणाला कोणालाही जिम्मेदार धरु नका. Sorry पप्पा मी आज तुम्हाला सोडून चालले. इच्छा तर होत नाही तुम्हाला सोडून जाण्याची पण काय करु मजबुरी आहे माझी. मी खूप जास्त दुखी होते पप्पा आज. आज माझा पूर्ण जीवन हरवून गेलं पप्पा. मला आज खूप जास्त आठवण येत होती तुमची. तरी तुम्ही मला सकाळी कॉल केला, तर खूप छान वाटल मला. पप्पा तुम्ही तुमची आणि मम्मीची काळजी घ्या. आता जास्त चिडचीड नका करत जाऊ घरामध्ये. साक्षीचं लग्न करुण टाका, माझ्या लग्नाचे पैसे पण तिच्या लग्नाला लावा. तिला छान मुलगा बघा. कस सांगू पप्पा तुम्हाला आता माझ्या एका चुकीन माझी पूर्ण लाईफ बदलून टाकली. मी खूप दुःखी केलं पप्पा आज. पण, काय करु अस काही वाटलच नव्हत अशी वेळ येईल माझ्यावर. मला माफ पप्पा.
पप्पा तुमचा माझावर खूप जीव होता. खूप रडले पप्पा मी. या चार वर्षात पण तुम्हाला कधी दुःख दाखवल नाही. पण मी खूप त्रास सहन केला. पण आता सहन होत नाही म्हणून मी अस करते. मी खूप मोठी चुक केली. माझ्या शिक्षकाला आणि पप्पा तुम्हाला खूप दु:ख होणार आहे. माझा ताण घेऊ नका पप्पा तुमची काळजी घ्या. मम्मीची पण काळजी घ्या. मी तर नाही केलं स्वप्न पूर्ण पण सार्थक नक्की करेल. कारण मला तेवढा विश्वास आहे. पप्पा सार्थक खूप लहान आहे अजून. तुम्हाला एकच विनंती करते. तुम्ही शेतावरून लोकाला भांडत नाका जाऊ नका, जेव्हा तुमचे भांडण होतं लोकांसोबत तेव्हा खूप जास्त भिती वाटते. तुम्हाला बोलायची हिंमत नाही. साक्षीचं लग्न करुन टाका. चांगला मुलगा पाहून. खूप काही लिहायचं होत पप्पा. अजून पण काही कळतच नव्हतं. जाता वेळेस एवढंच सांगून जाते पप्पा मला माफ करा.
तुमची राणी
अशी सुसाईड नोट तिने वडिलांनी लिहली आहे. यामध्ये तिने का आत्महत्या केली याचे सविस्तर कारण सांगितले आहे. तसेच माझ्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरु नका असेही तिने म्हटले आहे.